Sat, Feb 16, 2019 17:15



होमपेज › Belgaon › न्यायालयात घोषणा : ७ जणांवर गुन्हा

न्यायालयात घोषणा : ७ जणांवर गुन्हा

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 10:40PM

बुकमार्क करा





बेळगाव : प्रतिनिधी

सोमवारी रात्रीच्या दंगलीनंतर मंगळवारी न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारात काहींनी जोरदार घोषणाबाजी केली होती. घोषणाबाजी करणार्‍या 7 जणांविरोधात सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर कारागृहाकडे नेण्यात येत असताना न्यायालय आवारात थांबलेल्या जमावाने घोषणाबाजी केली. याची गंभीर दखल बेळगाव जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांनी घेतली होती. न्यायालय आवारात झालेल्या घोषणाबाजीसंदर्भात न्यायाधीश सतीश सिंग यांनी पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याबरोबर चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानंतर सीमा लाटकर यांनी न्यायालय आवारात घोषणा देणार्‍या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना मार्केट पोलिसांना दिली. 

पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी घोषणाबाजी झालेल्या दिवसाचे चित्रीकरण आणि छायाचित्रे मागवून घेतली होती. त्यानंतर   सय्यद जलाल (रा. बाशीबन कंपाऊंड), आयेशा एम. सनदी उर्फ मुल्ला (रा. पंतबाळेकुंद्री), नवीद मादार (रा. कोतवाल गल्ली), बारगिरी (रा. बाशीबन कंपाऊंड), अल्ताफ खानापुरी (रा. बाशीबन कंपाऊंड), साकीब (रा. बाशीबन कंपाऊंड), युनूस हुक्केरी (रा. दरबार गल्ली) या सात जणांविरोधात मार्केट पोलिसांनी सुमोटो अंतर्गत गुन्ह दाखल केला आहे. अटक केलेल्याविरोधात बेकायदा जमाव, दोन समाजात तेढ निर्माण करणे, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल केले आहेत.