Tue, Apr 23, 2019 09:47होमपेज › Belgaon › उद्रेक जमावाचा अटक तिघांना

उद्रेक जमावाचा अटक तिघांना

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 10 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

आरटीओ चौकात टिप्परने दुचाकीस्वार युवकाला चिरडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टिप्पर पेटवून दिला होता. त्याबद्दल तीन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही चित्रणाचा आधार घेऊन ही कारवाई झाली. मात्र, जमावाचाच उद्रेक झाला असताना, तिघांनाच अटक झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. टोपी गल्‍लीतील रहिवासी इनायत  बशीर अहमद शेख (वय 20) गेल्या सोमवारी आरटीओ चौकात टिप्परच्या धडकेत अपघाती मृत्यु झाला होता. त्यानंतर जमावाने टिप्पर पेटवून दिला. त्याबद्दल अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरटीओ चौकाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे त्यादिवशीचे चित्रण पोलिसांनी तपासून अरिफ नूरअहमद मुल्ला (21 रा.टोपी गल्ली),शहबाज ईकबाल यरगट्टी (19 रा.वीरभद्रनगर) व सलमान खुतबुद्दीन किल्लेदार (19 रा.धामणे) हे टिप्पर पेटवताना आढळून आले. त्या तिघांनाही अटक करुन त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात  करण्यात आली आहे.दरम्यान त्या दिवशी मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने टिप्पर पेटवीले मात्र तीघांनाच अटक झाली याबद्ल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.