Thu, Jul 18, 2019 02:45होमपेज › Belgaon › सिध्दरामय्यांना मागासवर्गीयांचा विसर 

सिध्दरामय्यांना मागासवर्गीयांचा विसर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

निवडणुकीपूर्वी  मागास व दलितांचा जप करणार्‍या सिध्दरामय्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मागास, दलितांचा विसर पडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते के. एस. ईश्‍वरप्पा यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने मागासवगीर्र्यांच्या मेळाव्याचे आयोजन येथे शनिवारी करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राज्यातील मागासवर्गीयांच्या अनेक केेंद्रांना यापूर्वीच्या भाजप सरकारने भरीव अनुदान दिले होते. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, मागावर्गीयांसाठी अन्य काही योजना राबविल्या होत्या. काँग्रेस सरकारने या समुदायासाठी काय केले ते दाखवून द्यावे, असा सवाल त्यानी केला.

मागील निवडणुकीत मागास व दलितांच्या पाठिंब्यावरच काँग्रेस सत्तेवर आले, असे काँग्रेसजन सांगत असून हे साफ चुकीचे आहे. बीजेपी व केजेपी यांच्यातील दुफळीचा काँग्रेसला लाभ मिळाला. मागास व दलित हे काँग्रेसशी सहमत नाहीत तर भाजपशी, असे ते म्हणाले.   आ. शामनूर यांना पक्षातून वगळा लिंगायत? वीरशैव लिंगायत स्वतंत्र धर्मासाठी शिफारस करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शविणार्‍या आ. शामनूर शिवशंकरप्पा यांना सिध्दरामय्या यांनी पक्षातून वगळावे, अशी मागणी ईश्‍वरप्पांनी केली.

कागिनेले येथे 3 एप्रिलला मेळावा

भक्‍त कनकदास यांची कर्मभूमी कागिनेले येथे 3 एप्रिलला मागासवगीर्र्यांचा भव्य मेळावा  होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांसह अन्य वरिष्ठ नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. लाखो मागासवर्गियांची मेळाव्याला उपस्थिती राहणार असून हा मेळावा सिध्दरामय्यांना धडकीच भरणारा  ठरेल.    राज्यात 21 हिंदू कार्यकर्त्यांची हत्या झाली. सरकार मारेकर्‍यांचा शोध घेण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) कारवाई करण्यात येईल, असे सिध्दरामय्या सांगत आहेत. इंदिरा गांधीच नव्हे तर त्यांचे वडील जवाहरलाल नेहरूंना आरएसएसला हात लावणे शक्य झाले नाही तर तुमची काय हिंमत आहे, असा सडतोड सवाल ईश्‍वरप्पांनी  मुख्यमंत्र्यांना केला. 

आ. संजय पाटील म्हणाले, सिध्दरामय्या यांना मागासवर्गीयांबद्दल कळवळा असता तर त्यांनी ‘शादीभाग्य’ ऐवजी ‘विवाहभाग्य’ योजना सुरू करायला हवी होती.  लिंगायत स्वतंत्र धर्मासाठी शिफारस केलेल्या काँग्रेस सरकारने हिंदू धर्माचे तुकडे केले आहेत. नेहरु? जिना यांनी देशाचे दोन तुकडे केले तर सिध्दरामय्यांनी हिंदू धर्माचे तुकडे केले. नेते रघुनाथ मल्लापूरे म्हणाले, मागासवर्गातील महान नेत्यांची जयंती साजरी करण्याची पध्दत भाजपने सुरू केली, काँग्रेसने नव्हे. आगामी निवडणूक ही  राज्याच्या विकासात धोरणात्मक बदल घडवून आणणारी निवडणूक ठरणार आहे. मेळाव्याला भाजप (ग्रामीण) अध्यक्ष आ. डॉ. विश्‍वनाथ पाटील, महानगर भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुणी यांसह नेतेमंडळी उपस्थित होती. 
 


  •