Wed, Apr 24, 2019 08:11होमपेज › Belgaon › कार वायरिंगकडे दुर्लक्ष बेतते जीवावर

कार वायरिंगकडे दुर्लक्ष बेतते जीवावर

Published On: Mar 26 2018 1:18AM | Last Updated: Mar 25 2018 10:25PMबेळगाव : प्रतिनिधी

वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. चालत्या वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. चालकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी होत नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान होते. अशा घटना होण्यामागे वाहनचालकांचे वाहनाच्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याचे प्रमुख कारण समोर आले आहे. चन्नम्मा चौक येथे 22 रोजी ओमनी कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झालेे.

सुरू असलेली ओमनी कार अचानक बंद पडून सदर घटना घडली. वाहनातून धूर येत असल्याचे दिसताच वाहनातून प्रवाशांनी बाहेर पडून प्राण वाचविले. इतक्यात आग लागून संपूर्ण वाहन खाक झाले. या दुर्घटनेत प्राणहानी झाली नसली तरी  वाहनाचे नुकसान झाले. बर्निंग वाहनांचा थरार नेहमी पायला मिळतो. यासाठी चालकांनी वाहनाबाबतची देखभाल वेळोवेळी करायला हवी.

बर्निंग कारमागे  शॉर्टसर्किट हे कारण असल्याचे सांगण्यात आले. ही ओमनी पेट्रोलवर चालणारी होती. बंद पडलेली ओमनी सुरू करीत असताना अचानक धूर येऊन पेट घेण्यामागे पेट्रोल लिकेज व वायरिंगचे शॉर्टसर्किट हे आहे. चालकांनी वाहनाच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. वाहन एलपीजी गॅसकिटवर चालणारे असो वा पेट्रोलवर यामध्ये वायरिंगचे काम अधिक बारकाईने करून घेणे आवश्यक आहे. ख खुल्या वाहनातील वायर शॉर्टसर्किटला कारण होऊ शकते. यामुळेच अशा दुर्घटना घडतात. गॅसकिटला आग लागताच ते ऑटोमॅटिक लॉक होते. यामुळे दुर्घटना टळते. असे असले तरी  चालकांनी वाहनाच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 

चालकांनी वाहनाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. विशेष करून वायरिंग आणि पेट्रोल, गॅस लिकेज त्वरित दुरुस्त घ्यावे. या बाबींकडे  जागरूकतेने लक्ष दिल्यास अशा घटना टाळणे शक्य आहे. 
- प्रकाश नरसाई, शिवाजीनगर. गॅस वितरक

वायरिंग व बॅटरीमधील स्पार्कमुळे अशा घटना घडत असतात. यासाठी वाहनातील वायरिंगची दुरुस्ती तात्काळ करून घेणे आवश्यक आहे. शॉर्टसर्किटमुळे वाहनांना आगी लागण्याच्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी वाहनातील वायरिंग दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. 
- अन्सारी बाळेकुंद्री