Thu, Jul 18, 2019 16:39होमपेज › Belgaon › ‘नवहिंद’चा रौप्य महोत्सव 24 पासून

‘नवहिंद’चा रौप्य महोत्सव 24 पासून

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:02PMबेळगाव : प्रतिनिधी

नवहिंद क्रीडाकेंद्र येळ्ळूर संचलित नवहिंद को-ऑप. सोसायटी या आंतरराज्य संस्थेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येत्या शनिवार दि. 24 पासून बुधवार दि. 28 फेब्रुवारीपयर्ंत रौप्य महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या रौप्य महोत्सवानिमित्त येळ्ळूर आणि बेळगाव येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. एकूण 5 सत्रामध्ये होणार्‍या या कार्यक्रमात शनिवार दि. 24 फेब्रुवारी छ. संभाजी मैदान येळ्ळूर येथे सायं. 6 वा. शाहीर शितल साठे (सातारा) यांचा प्रबोधनपर पोवाडा कार्यक्रम होणार आहे. दुसर्‍या सत्रात रविवार दि. 25 रोजी याच मैदानावर सायं. 6 वा. ‘नवहिंद श्री’ राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहेत. 

सोमवार दि. 26 रोजी मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे सायं. 5 वा. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे छ. शिवाजी महाराज जीवन आणि कार्य यावर व्याख्यान,  याच ठिकाणी मंगळवार दि. 27 रोजी चौथ्या सत्रात प्रश्‍न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचे व्याख्यान आणि पाचव्या सत्रात बुधवार दि. 28 रोजी सरकारच्या आर्थिक धोरणाचा बॅकिंग व सहकार क्षेत्रावर परिणाम यावर कॉ. विश्‍वास उटगी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ भागधारक व ग्राहकांचा गौरव, संस्था स्थापना काळातील कर्मचार्‍यांचा गौरव, नवहिंद क्रीडा केंद्राच्या कार्यकर्त्यांचा गौरव आयोजित करण्यात आला आहे.