Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Belgaon › मिल्स ऑन व्हील्स ची चलती विनापरवाना

मिल्स ऑन व्हील्स ची चलती विनापरवाना

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 22 2018 9:50PMबेळगाव  : प्रतिनिधी 

शहराच्यामध्यवर्ती रस्त्यावर ठिय्या मांडणारे हातगाडीवाले व बैठ्या विके्रत्यांचा प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातच चारचाकी वाहने रस्त्यावर लावून मिल्स ऑन व्हील्स व्यवसाय फोफावतो आहे.विनापरवाना आणि भूभाडे न देता सुरू असलेल्या या व्यवसायाकडे मनपाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. शहर उपनगरातील रस्त्यांवर ठाण मांडून बसणारे व हातगाडीवाल्यांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असतो. कष्ट करून पोट भरण्यास अथवा व्यवसाय करण्यास कोणाची हरकत नसावी. मात्र फेरीवाले, बैठ्या विक्रेत्यांमुळे होणारी रहदारीची अडचण ओळखून नागरिकांमध्ये सातत्याने चर्चा होत असते. शहराचा हॉकर्स झोन कागदावर राहिला आहे.हॉकर्स झोनवर मनपा सभागृहात अनेकवेळा चर्चाही झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना फेरीवाले आपली व्हॉटबँक वाटते. यामुळे हॉकर्स झोनला काही लोकप्रतिनिधी पडद्याआडून विरोध करत  आहेत.

शहर  उपनगरात 3300 बैठे व फेरीवाले आहेत. त्यांच्याकडून मनपावतीने प्रत्येक दिवशी भूभाडे आकारले जाते. मनपाच्यावतीने 300 प्रकारच्या उद्योगव्यवसायांना परवाने दिले जातात. शहर उपनगरात हजारो व्यवसाय विनापरवाना सुरू आहेत. यामध्ये वाहनातून उद्योग व्यवसाय करणार्‍यांची भर पडली आहे. काही जण चारचाकीतून फळे, कपडे विक्री करत आहेत. काहींनी छोट्या वाहनातून अन्य प्रकारचे व्यवसाय चालवले आहेत.

काही दिवसांपासून हिंदवाडी आरपीडी रस्त्यावर चारचाकीतून खमंग खाद्यपदार्थ विकले जात आहेत.आकर्षकरीत्या सजवलेल्या या वाहनातून सायंकाळी व्यवसाय सुरू होतो. रात्री उशिरापर्यंत खवय्यांची गर्दी दिसते. रस्त्यावरच खाण्या-पिण्याचा खुल्लमखुल्‍ला प्रकार पाहायला  मिळतो. रसत्याशेजारी चारचाकीतून चालणारा व्यवसाय आणि त्या ठिकाणी होणारी अन्य वाहनांची गर्दी नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. नव्याने सुरू झालेल्या त्या वाहनातील व्यावसायिकांकडे मनपाचा कोणताच परवाना नाही. त्यांच्याकडून भूभाडेही भरून घेतले जात नसल्याची चर्चा आहे. यामुळे अनधिकृत चाललेल्या या नव्या व्यवसायाला मनपाची फूस असल्याचा आरोप केला जात  आहे.