Wed, Apr 24, 2019 22:19होमपेज › Belgaon › बेळगाव महापौरपद महिलेसाठी राखीव

बेळगाव महापौरपद महिलेसाठी राखीव

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:56PMबेळगाव / चिकोडी : प्रतिनिधी

बेळगावचे महापौरपद महिलेसाठी राखीव राहणार असून उपमहापौरपद इतर मागास ब वर्गातील महिलेसाठी राखीव राहणार आहे. सोमवारी रात्री उशिरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी नगरपालिका अध्यक्षपद सामान्य महिलेसाठी राखीव आणि उपाध्यक्षपद खुले असेल.  खानापूर नगर पंचायतीचे अध्यक्षपद इतर मागास ‘अ’ गटासाठी राखीव आहे तर उपाध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. चिकोडी नगर परिषद अध्यक्षपद एसटीसाठी आरक्षित असून भाजपाचे नागराज मेदार पात्र आहेत, तर उपाध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून त्या पदासाठी काँग्रेसच्या लता माळगे व शिल्पा माळगे पात्र ठरतात.

अथणी नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी मागासवर्गीय ‘अ’ वर्ग तर उपाध्यक्षपदासाठी सामान्य आरक्षण जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे बैलहोंगल- अध्यक्ष-सामान्य, उपाध्यक्ष-मागास ‘अ’,  उपाध्यक्ष- एससी महिला, हारुगेरी- अध्यक्ष- मागास  ‘अ’ महिला, उपाध्यक्ष-सामान्य, हुक्केरी-अध्यक्ष-सामान्य, उपाध्यक्ष-मागास ‘अ’, कुडची-अध्यक्ष-मागास अ-वर्ग, उपाध्यक्ष-मागास ‘ब’, सदलगा-अध्यक्ष एसटी महिला, उपाध्यक्ष-एससी महिला, संकेश्‍वर- अध्यक्ष व उपाध्यक्ष-सामान्य महिला यासह राज्यातील 116 नगरपालिका व नगरपरिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.