Wed, Apr 24, 2019 20:18होमपेज › Belgaon › मराठी भाषा संवर्धनासाठी हवे अनुदान

मराठी भाषा संवर्धनासाठी हवे अनुदान

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:33PMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने राज्यात भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. भाषा संवर्धनासाठी निधीचीही तरतूद केली आहे. मात्र  बेळगाव व सीमाभागात मराठी भाषा संवर्धनाचे काम करणार्‍या संस्थांना निधीची चणचण भासत आहे. यामुळे  महाराष्ट्र सरकारने  अनुदान द्यावे, असा सूर येथील मराठी जनतेतून उमटत आहे. महाराष्ट्र भाषा संवर्धनासाठी  भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून 1 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यासाठी खास अनुदानाची तरतूदही केली आहे. मात्र येथील वाचनालयांना महाराष्ट्राकडून मिळणारे नुदानही रखडले आहे.

 बेळगाव व सीमाभागात मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यात येथील संस्था धडपडत आहे. मराठी भाषा दिनही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे. प्रा.डॉ.हरी नरके यांचे व्याख्यान  येथील सार्वजनिक वाचनालय, सरस्वती वाचनालय, वाङ्मर चर्चा मंडळ, लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्यसंघ, कॉ.कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ व मराठी विद्यानिकेतन यांच्या संयुक्‍त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा प्रा.डॉ. हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मराठा विद्यानिकेतनच्या सभागृहात मंगळवार दि. 27 रोजी ‘अमृत मराठी, अभिजात मराठी’यावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. 

‘वाचाल तर वाचाल’

 उपक्रमात 50 वे व्याख्यान  भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. मायाप्पा पाटील यांनी सीमाभागात मराठी साहित्य वाचनाची गोडी व वाचनाचे महत्तव तरूण पिढीला कळावे, यासाठी धडपडत आहेत.  ‘वाचाल तर वाचाल उपक्रमाविषयी’ चे 50 वे व्याख्यान भाषादिनानिमित्त भाऊराव काकतकर महाविद्यालय आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रापेक्षाही मोठ्या आत्मीयतेने सीमाभागात मराठी संवर्धन केले जात आहे. येथील जनता केवळ भाषादिनानिमित्तच मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करत नाही तर वर्षभर साहित्य संमेलने, सांस्कृतिक संमेलने आयोजित करून मराठीचा प्रचार व प्रसार केला जातो. यासाठी किमान महाराष्ट्राने तरी अनुदान द्यायला हवे. - आशा कुलकर्णी, विश्‍वस्त व संचालिका, मंथन संस्था 

देशात अनेक प्रादेशिक भाषा लुप्‍त होत आहेत. याच वाटेवर मराठी भाषा जाऊ नये, यासाठी मराठी साहित्य वाचनाची गोडी वाढावी व वाचनाचे महत्त्व कळावे. यासाठी ‘वाचाल तर वाचाल’ हा उपक्रम राबवत आहे. भाषा दिनानिमित्त या उपक्रमाद्वारे 50 वे व्याख्यान सादर करणार  आहे. 

-प्रा. मायाप्पा पाटील, भाऊराव काकतकर महाविद्यालय