होमपेज › Belgaon › कानडी लबाडी ‘अभिजात’च्या आड

कानडी लबाडी ‘अभिजात’च्या आड

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 1:03AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी भाषा सहजासहजी मरणारी नाही. सीमाभागात मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या तळमळ, धडपडीला माझा सलाम आहे. देशात तामिळ, संस्कृती, तेलगू, कन्‍नडला अभिजातचा दर्जा मिळाल्यानंतर कन्‍नडिगांनी नेतृत्व करून केंद्राकडे आग्रह धरून निकष बदलले. केवळ मराठीला अभिजात दर्जा मिळू नये म्हणून कानडी लबाडी करण्यात आली, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व अभिजात भाषा समितीचे समन्वयक प्रा. डॉ. हरी नरके यांनी व्यक्‍त केली.

मराठी विद्यानिकेतनमध्ये गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित मराठी भाषा दिन कार्यक्रमात ‘अभिजात मराठी, अमृत मराठी’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. मनोहर किणेकर, प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, चिटणीस सुभाष ओऊळकर, नेताजी जाधव होते. स्वागत मालोजी अष्टेकर यांनी केले.