Thu, May 23, 2019 05:04होमपेज › Belgaon › मोक्षेस शाह यांची शोभायात्रा

मोक्षेस शाह यांची शोभायात्रा

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 27 2018 9:31PMबेळगाव : प्रतिनिधी

मोक्षेस संदीपभाई शाह हे जैन साधूची दीक्षा घेणार आहेत. त्यानिमित्त मंगळवारी (दि. 27) श्री चंद्रप्रभ जैन श्‍वेतांबर संघातर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. पांगुळ गल्ली येथील संघाच्या जैन मंदिरात पूजाविधी झाल्यानंतर  सकाळी 9.30 वा. संयुक्त महाराष्ट्र चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली. रामदेव गल्ली, मारुती गल्ली, कलमठ रोड, रविवार पेठ, मेणसी गल्लीमार्गावरून फिरून पांगुळ गल्लीतील जैन मंदिरात शोभायात्रेची सांगता झाली. बँडच्या निनादात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत फुलांनी सजविलेल्या बग्गीमध्ये मोक्षेस तर दुसर्‍या बग्गीमध्ये वडील संदीपभाई, आई व आजोबा जयंतीभाई शाह होते.

रथामध्ये भगवानांची मूर्ती ठेवण्यात आली होती. शोभायात्रा मार्गावर संघातर्फे प्रसाद म्हणून लाडुंचे वाटप करण्यात आले. शोभायात्रेत एक हजाराहून अधिक जैन धर्मिय बांधवˆमहिला, युवक, युवती, लहानमुले सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या सांगता प्रसंगी संघातर्फे चेअरमन कांतीलाल पोरवाल यांनी मोक्षेस यांचा सत्कार केला. वैभवातून वैराग्याकडे वाटचाल करणार्‍या मोक्षेस यांनी प्रत्येकांना  धार्मिक वस्तू भेटीदाखल देऊन कृतज्ञता व्यक्त केली. दुपारी मंदिरात महिलांकरिता ‘रांझी’ चा कार्यक्रम झाला.