Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Belgaon › अखेर पोलिसांना मिळाले ‘आयएसआय’ हेल्मेट

अखेर पोलिसांना मिळाले ‘आयएसआय’ हेल्मेट

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 23 2018 1:16AMबेळगाव  : प्रतिनिधी 

 दुचाकीचालकांनी आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरावीत, असा आदेश पोलिस प्रशासनाने बजावला आहे. दरम्यान, दुचाकीचालकांना आदेश देणारे पोलिसच नियमबाह्य हेल्मेट वापरत होते. त्यासंदर्भात दै. ‘पुढारी’ने सचित्रवृत्तांत दिला होता. यामुळे खडबडून जागे झालेल्या  पोलिस आयुक्‍तालयाने विभागातील 14 पोलिस ठाण्यातील 1200 पोलिसांना आज आयएसआय प्रमाणित हेल्मेट दिली. उ. विभागाचे पोलिस महानिरीक्षक आलोककुमार आणि पोलिस आयुक्‍त राजप्पा यांनी हेल्मेटसक्‍ती आणि रहदारी नियमांवर बोट ठेवून नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवारपासून शहरात हेल्मेटसक्‍ती सुरू झाली आहे. 27  पासून बेळगाव जिल्हा आणि उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यात हेल्मेटसक्‍ती सुरू होणार आहे.

दुचाकीचालकांनी आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरावेत, रहदारी नियमांचे पालन करावे; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आलोककुमार आणि राजप्पा यांनी दिला होता. दरम्यान, पोलिसांच्या डोक्यावरील हेल्मेट आयएसआय दर्जा प्राप्त नसल्याचा पोलखोल दै. ‘पुढारी’ने 19 जानेवारी रोजी केला. यामुळे जागे झालेल्या पोलिसांनी सोमवारी आयएसआय प्रमाणित हेल्मेटचे वितरण केले. 

पोलिसांची नियमबाह्य हेल्मेट वापराबाबत रहदारी विभागाचे सहा. पोलस उपायुक्‍त एम. एल. मुप्पीनमठ यांच्याशी दै. ‘पुढारी’ने चर्चा केली होती. त्यावेळी मुप्पीनमठ यांनी पोलिसांच्या नियमबाह्य हेल्मेट आणि रहदारी नियमभंग करणार्‍या पोलिसांबाबत कबुली दिली होती. त्यानुसार 19 जानेवारीला क्‍लब रोडवर नो पार्किंग जागेत लावलेल्या पोलस वाहनावर कारवाई केली. तसेच 1200 पोलिसांना आसएसआय प्रमाणित  हेल्मेट  पुरविली.