Sun, Nov 18, 2018 03:36होमपेज › Belgaon › देशात पुन्हा एकदा हरितक्रांती

देशात पुन्हा एकदा हरितक्रांती

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:29PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. या देशात पुन्हा एकदा हरितक्रांती झाल्याशिवाय शेतकर्‍यांचे कल्याण होणार नाही, त्यासाठी केंद्र सरकारतर्फे योजना अंमलात आणण्यात येणार आहे. 2021 सालापर्यंत देशामध्ये ‘सन राईस सेक्टर’ तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्‍त केले. भारतीय कृषक समाज नवी दिल्ली  आणि कर्नाटक राज्य राष्ट्रीय कृषी संघटना यांच्या संयुक्‍त विद्यमाने केएलई संस्थेच्या बी. एस. जिरगे शतमानोत्सव सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत  होते. 

कृषी क्षेत्राला वाव देण्यासाठी गावागावामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोणताही लाभ न घेता येत्या 2021 सालापर्यंत कृषिक्षेत्राच्या वाढीसाठी सन राईस सेक्टर उपलब्ध करण्यात येणार आहे. व्यासपीठावर खा. सुरेश अंगडी,  भारतीय कृषक समाजाचे डॉ. किसनवीर चौधरी, लिंगराज बी. पाटील, खा. डॉ. प्रभाकर कोरे, जी. बी. विश्‍वनाथ, महादेव दानण्णावर, नागराज, गुरूगौड पाटील आदी उपस्थित होते.