Tue, Sep 17, 2019 18:03होमपेज › Belgaon › बेळगाव-गोवा महामार्ग  रुंदीकणाचे आज उद्घाटन

बेळगाव-गोवा महामार्ग  रुंदीकणाचे आज उद्घाटन

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:30PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे उद्घाटन आज सोमवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार आहे.सुवर्णसौधमध्ये हा कार्यक्रम होईल.   महामार्गासाठी 1342 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. बेळगाव-खानापूर-अनमोड-गोवा असा हा महामार्ग असून, खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात महामार्ग फक्‍त दुपदरी असेल. महामार्गावर दोन ओव्हरब्रिज व एक मलप्रभा नदीवरील प्रमुख ब्रिज यांचा समावेश आहे.

खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत 52.3 कि. मी.पर्यंत महामार्ग दुपदरी असेल. गडकरी यांच्या हस्ते गोटूर ते विजापूर या 170 कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या कामाचेही उद्घाटन सोमवारी कागवाडमध्ये होईल. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग हलगा-मच्छे या रस्त्याने जोडला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही महामार्गांवरील वाहनांना शहरात येण्याची गरज भासणार नाही; पण हा बायपास मार्ग पिकाऊ जमिनीत जाणार असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. हा मार्ग होऊ नये, यासाठी त्यांचा विरोध असून, उद्या मंत्री गडकरी यांना शेती बचाव संघटनेकडून निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे.