Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Belgaon › आज बेळगावात मोर्चा; उद्या ‘संकेश्‍वर बंद’ 

आज बेळगावात मोर्चा; उद्या ‘संकेश्‍वर बंद’ 

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:27AM

बुकमार्क करा

बेळगाव :  प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ शहरातील विविध दलित संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मवीर संभाजी चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. कोरेगाव दंगल, विजापूरच्या अत्याचारग्रस्त मुलीच्या मारेकर्‍यांना शिक्षा आणि राज्यघटना बदलण्याची भाषा करणाऱे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटना करणार आहेत. 
मोर्चाला बेळगाव वकील संघटनेने पाठिंबा दिला असून, महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी न करण्याचे निवेदन न्यायालयाला सादर केले आहे. दरम्यान, कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ स्थानिक दलित संघटनांनी गुरुवारी संकेश्‍वर बंदची हाक दिली आहे. आंबेडकर  चौकातून सकाळी 10 वा. मूक मिरवणूक निघणार आहे.