Sun, May 26, 2019 19:42होमपेज › Belgaon › 16 पैकी दोन पाटील, 17 पैकी दोन ‘कर’ विजयी

16 पैकी दोन पाटील, 17 पैकी दोन ‘कर’ विजयी

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 12:41AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव  जिल्ह्यातील 18 मतदारसंघांत 203 उमेदवारांपैकी 16 पाटील व 17 ‘कर’ नशीब आजमावत होते. पैकी दोन पाटील व दोन कर यांना विजय संपादन करता आला. दोन पुरुष व दोन महिला उमेदवार आमदार झाल्या आहेत. यापैकी दोघे माजी आमदार होते.  महिलांना पहिल्यांदाच जिल्ह्यात तालुक्याची आमदार होण्याचा मान मिळाला आहे.

बेळगाव दक्षिणमधून अभय पाटील निवडणूक लढवीत होते. 2008 मध्ये त्यांनी बेळगाव दक्षिणमधून भाजपतर्फे  निवडणूक लढवून आमदार होेण्याचा मान मिळविला होता. पुन्हा 2013 मध्ये त्यांनी निवडणूक लढविली. मात्र त्याना पराभव स्वीकारावा लागला. यंदा ती उणीव त्यांनी भरुन काढली आहे. कागवाड मतदारसंघातून श्रीमंत पाटील यांनी निवडणूक लढवत काँग्रेसला  या मतदारसंघात पुन्हा स्थान मिळवून दिले. यामुळे एकूण 14 पाटीलपैकी दोघा पाटलांना विजय संपादन करता आला.

बेळगाव ग्रामीणमधून लक्ष्मी हेब्बाळकर या सतत काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवित होत्या. यंदा प्रचंड मताधिक्याने त्या विजयी झाल्या. खानापूरमधून गेल्या तीन वर्षापासून डॉ. अंजलीताई निंबाळकर समाजकार्याच्या माध्यमातून कार्य करीत होत्या. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून यंदा त्याना आमदार होण्याचा मान मिळाला आहे. यामुळे 17 कर पैकी दोन ‘कर’ महिलांना तो मान मिळाला आहे. यामुळे दोन पाटील व दोन कर आमदार झाले असून उर्वरीत 14 पाटील व 15 करना पराभव स्वीकारावा लागला आहे.

निवडणुकीमध्ये 18 मतदार संघापैकी बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण व निपाणी मतदारसंघात 8 पाटील नावाचे उमेदवार तर 11 कर अडनावाचे उमेदवार निवडणूक लढवीत होते. यामुळे यंदाच्या निवडणुकीत पाटील विरुध्द कर असा फड रंगला होता. खानापूर मतदारसंघात 12 उमेदवारांपैकी दोन पाटील तर सहा उमेदवार कर आडनावाचे होते. बेळगाव दक्षिणमध्ये 13 उमेदवार होते.  पैकी एक पाटील अडनावाचा होता. उत्तर मतदारसंघात एक पाटील तर दोन उमेदवार कर अडनावाचे निवडणुकीच्या रिंगणात होते. बेळगाव उत्तरमधून संभाजी पाटील यांनी माघार घेतली होती. बेळगाव ग्रामीणमध्ये दोन उमेदवार पाटील अडनावाचे होते. तीन उमेदवार कर अडनावाचे होते.  यंदाच्या विधानसभा निवडणूकीत कर विरुध्द पाटील अशी लढत रंगली.