Fri, May 24, 2019 03:17होमपेज › Belgaon › जिल्हा प्रशासनातर्फे मनोजचा सत्कार

जिल्हा प्रशासनातर्फे मनोजचा सत्कार

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 16 2018 10:24PMबेळगाव : प्रतिनिधी

तिलारी येथील धबधब्यात बुडणार्‍या दोन मुलींना वाचविणार्‍या मनोज परशराम धामणेकर (कुद्रेमानी) याच्या कार्याची दखल घेउन जिल्हा प्रशासनाने सत्कार केला. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी त्याच्या कार्याचे कौतुक केले.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवार दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मनोज धामणेकर याचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खा. सुरेश अंगडी, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, प्रांताधिकारी कविता योगपण्णावर आदी 
उपस्थित होते.

तिलारी ता. चंदगड येथील धबधब्यात बुडणार्‍या दोन मुलींना मनोज धामणेकरने 19 जुलै रोजी वाचविले. यामुळे त्याच्यावर कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही त्याचा सत्कार केला होता. 

चंदगडचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड पंचायत समिती कार्यालयात मनोजचा सत्कार करण्यात आला. मात्र, बेळगाव जिल्हा प्रशासनाने त्याच्या कार्याची दखल घेतली नाही. यामुळे ‘दै. पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने बुधवारी त्याचा सत्कार केला. याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.