Fri, Jul 19, 2019 05:34होमपेज › Belgaon › ‘24 तास पाण्या’साठी मिळेना कंत्राटदार

‘24 तास पाण्या’साठी मिळेना कंत्राटदार

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 10 2018 12:11AMबेळगाव : प्रतिनिधी     

संपूर्ण शहरात 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी  योजना हाती घेण्याचा निर्णय  मूूलभूत सुविधा व आर्थिक महामंडळाने  तीनवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविल्या. मात्र सलग तिसर्‍या वेळीही कोणतीही कंपनी निविदा भरण्यासाठी पुढे आलेली नाही. त्यामुळे 24 तास पाण्याचे बेळगावकरांचे स्वप्न तूर्त अधुरे राहणार आहे.
शहराच्या एकूण 58 प्रभागांपैकी 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना 2010 पासून सुरू आहे. वियोलिया इंडिया प्रा. लि. या कंपनीने 10 प्रभागांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.

2026 व 2041 पर्यंत बेळगाव शहराची लोकसंख्या व त्याकाळात शहरवासीयांची पाण्याची गरज लक्षात घेऊन शहराच्या अन्य 48 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यांत योजना हाती घेण्याची तयारी कर्नाटक नगर मूूलभूत सुविधा व आर्थिक महामंडळाने तयारी केली. योजनेसाठी जागतिक बँकेकडून 72 टक्के व राज्य सरकार आणि महानगरपालिकेसह अन्य संस्थांचा वाटा 28 टक्के निधी असणार आहे. योजनेची व्याप्ती मोठी असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविण्यात आल्या  होत्या.  2014 व 2015 मध्ये निविदेमध्ये बोली केलेल्या कंपन्यांनी तांत्रिक कारण पुढे करून योजना राबविण्याला नकार दर्शविला होता.

निविदा दाखल करण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या तांत्रिक अटींचे पालन करणे विदेशी कंपन्यांना शक्य होत नसल्याने  निविदेसाठी बोली करण्यास पुढे येत नसल्याचे समजते. याच कारणामुळे गेल्या 19 जानेवारी रोजी तिसर्‍यांदा मागविण्यात आलेल्या निविदेसाठी कोणतीही कंपनी पुढे आलेली नाही.