Mon, Apr 22, 2019 04:14होमपेज › Belgaon › तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे

तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे

Published On: Feb 04 2018 9:57PM | Last Updated: Feb 04 2018 9:10PMबेळगाव  : प्रतिनिधी

फेब्रुवारी सुरू होताच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना व्हॅलेंटाईन डेचे वेध लागतात. 14 फेब्रुवारीजवळ आल्याने शुभेच्छा संदेश, फुले, चॉकलेट किंवा अगदी आवडती वस्तू देऊन प्रेम व्यक्त करण्याची प्रथा आजच्या घडीला रुजली आहे.  अनेक प्रकारच्या भेटवस्तू खरेदी करून प्रिय व्यक्तीला देण्याची पाश्‍चिमात्य प्रथा आजच्या तरुणाईत रुजल्याने वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ फुलू लागली आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हार्टशेफ फिलो, म्युझिकल हार्ट, फ्लॉवर बास्केट, फोटो फ्रेम, लव्ह कोटेशन फ्रेम,

लिफाफा ग्रीटिंग्ज, कपल किचेन, फॅन्सी चॉकलेट यासंह शॅम्पेन बॉटल किचन, लिप्स चॉकलेट, चॉकलेट बुके,  हार्टशेप चॉकलेट आदी प्रकारचे चॉकलेट बाजारात उपलब्ध आहेत.  मुलांसाठी परफ्यूम, वॉलेट, फॅन्सी बॅग, हार्टचे पॅडेन्ट, ब्रासलेट, ग्रीटींग्ज कार्ड अशा आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. 40 पासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू बाजारात आल्या आहेत. 

शहरातील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली आदी ठिकाणच्या गिफ्ट शॉपमध्ये तरुण व तरुणींची व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. 7 पासूनच विविध डेज ना सुरुवात 7 फेब्रुवारीपासून विविध डेची लगबग सुरू होते. 7  रोजी डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि शेवटी व्हॅलेंटाईन डे असे दिन साजरे केले जातात.