Sat, Sep 22, 2018 08:42होमपेज › Belgaon › शहरात ‘कॉलेज डेज’ची धूम

शहरात ‘कॉलेज डेज’ची धूम

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 8:56PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनेक महाविद्यालयात ‘कॉलेज डेज’ची धूम पाहायला मिळत आहे. अनेक महाविद्यालयात साडी डे, ट्रॅडिशनल डे उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या सत्रातील परीक्षा संपताच दुसर्‍या सत्रात महाविद्यालयीन तरुण, तरुणींना वेध लागतात ते डेजचे. महाविद्यालयात अनेक दिवसांपासून ओस पडलेले कॉलेज कट्टे बहरू लागले असून कॉलेज आवारात गर्दी व्हायला लागली आहे. तरुणींचा सर्वाधिक आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे सारी डे, ट्रॅडिशनल डे, प्रोफशनल डे, एंजल डे, रेट्रो डेचा.