Thu, Apr 18, 2019 16:14होमपेज › Belgaon › शिवरायांनी चेतविला सर्वसामान्यांत स्वाभिमान

शिवरायांनी चेतविला सर्वसामान्यांत स्वाभिमान

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:31PMबेळगाव  : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. सामान्य जनतेला सोबतीला घेऊन त्यांनी बलाढ्य अशा शक्तींचा सामना केला. यामुळेच दर्‍याखोर्‍यातील जनतेच्या अंगात बळ संचारले आणि त्यांच्यातील स्वाभिमान जागा झाल्याचे प्रतिपादन ग्रा. पं. सदस्य काशिनाथ गुरव यांनी व्यक्त  केले. कुद्रेमानी येथील बलभीम साहित्य संघ व कुद्रेमानी ग्रामस्थांच्यावतीने वाचनालयात सोमवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी गुरव बोलत होते. त्याचबरोबर जयभीम युवक संघाच्यावतीनेदेखील शिवजयंती साजरी करण्यात आली.

गुरव यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. जोतिबा पडसकर यांनी श्रीफळ वाढविले. ग्रा. पं. सदस्य नागेश राजगोळकर म्हणाले, शिवाजी महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात. जोतिबा बडसकर, ईश्‍वर गुरव यांनी मनोगत व्यक्त केेले. यावेळी बाळाराम धामणेकर, शांताराम गुरव, अर्जुन बडसकर, शिवाजी मुरकुटे, गावडू पाटील, गोपाळ चौगुले, शाहू सुतार, मारुती गुरव, दीपक मराठे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव अमित मोहिते यांनी केले. आभार मारुती पाटील यांनी  मानले.

जयभीम संघातर्फे शिवजयंती

जयभीम युवक संघटनेच्यावतीने हरीजन गल्लीत शिवजयंती थाटात साजरी करण्यात आली. संजय कांबळे यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. दत्ता कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना सन्मानाचे स्थान देण्यात आले. ते रयतभूषण होते. यामुळे शिवरायांचा जयघोष आजही करण्यात येतो. यावेळी रामलिंग कांबळे, तानाजी हरीजन, विलास कांबळे, नामदेव कांबळे, अजित कांबळे, आकाश कांबळे, रमेश कांबळे, भारत कांबळे, अमृत कांबळे, आकाश कांबळे, लकाप्पा कांबळे, एकनाथ कांबळे , राजाराम कांबळे, वैजू कांबळे आदीसह जयभीम संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.