Sun, Jul 21, 2019 15:11
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सीमाभाग हा महाराष्ट्राचाच 

सीमाभाग हा महाराष्ट्राचाच 

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:18AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी माणसांच्या अंत:करणात जोपर्यंत मराठी भाषा, संस्कृती, परंपरा जिवंत आहे, तोपर्यंत या भागाची महाराष्ट्र आणि मराठीशी असणारी नाळ कोणीही तोडू शकणार नाही. सीमा प्रश्‍न कायम तेवत राहणार असून, हा भाग महाराष्ट्राचाच असल्याचे ठाम मत भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त केले. कडोली येथील मराठी साहित्य संघ, सांगाती साहित्य अकादमी आयोजित 33 वे साहित्य संमेलन रविवारी ‘स्वामी विवेकानंदनगरी’त  पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्‍वर मुळे बोलत  होते.

व्यासपीठावर उद्घाटक सुधीर दरेकर, सुमीत पिंगट, डॉ. सुभाष माने, सौरभ करडे, दीपक गायकवाड, शिवाजी बंडगर, अंकुश आरेकर, ज्ञानेश डोंगरे, साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर, स्वागताध्यक्ष संभाजी होनगेकर होते. मुळे म्हणाले, हा भाग खरेतर असीम आहे. याला सीमाभाग का म्हणतात, असा मला प्रश्‍न पडतो. या भागातील लोक जगभर पसरले असून, कर्तृत्व गाजवत आहेत. सीमा प्रश्‍नाचा तिढा अद्याप सुटला नसला, तरी मराठी माणसांनी भाषेच्या आधारावर झुंज देत लढा जिंकला आहे.