Thu, Jun 27, 2019 00:00होमपेज › Belgaon › बिट कॉईनचा व्यवहार धोक्याचा

बिट कॉईनचा व्यवहार धोक्याचा

Published On: Feb 04 2018 9:57PM | Last Updated: Feb 04 2018 8:46PMबेळगाव  :प्रतिनिधी

बिट कॉईन या आभासी चलनात गुंतवणूक करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहत करणार्‍या त्रिकुटाला शहरामध्ये पोलिसांनी नुकतीच अटक केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. या गुंतवणुकीला आरबीआयने विरोध दर्शविला आहे. असे असतानाही काही जणांनी इंटरनेटच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये बेळगावात तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून याची कसून चौकशी सुरू आहे. 

बीट कॉईन म्हणजे काय?

बिट कॉईन हे एक आभासी चलन आहे. यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच ठोस यंत्रणा नाही. कोणत्याच मध्यस्थीविना हा व्यवहार केला जातो. ही एक स्वतंत्र गुंतवणूक व्यवस्था असून याला जगभरात विरोध करण्यात आला आहे. 

असा चालतो व्यवहार?

ही एक विक्रेंद्रीकृत डिजीटल करन्सी आहे. कोणत्याच प्रकारची केंद्रीकृत बँक नसताना आणि यामध्ये मध्यस्थी नसताना हा व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून चालतो वपारखला जातो. बिटकॉन ही  अनोळखी ग्रुपच्या माध्यमातून व्यवहार चालविणारी संस्था आहे. 

कोणी अमलात आणली?

सातोशी नाकामोटो या व्यक्तीने 2009 मध्ये हे सॉप्टवेअर तयार करून व्यवहार सुरू केला. यामध्ये अनेकांनी गुंतवणूक केली असली तरी जगभरातील अनेक देशांनी या व्यवहाराला विरोध दर्शविला आहे. यासाठी कोणत्याच प्रकारचे चलन नसून हे आभासी चलन आहे. यावरच हा व्यवहार केला जातो.

कोणते व्यवहार होतात?

या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा भरणा  असतो. विविध घोटाळ्यातील बेहिशेबी पैशांची गुंतवणूक अधिक केली जाते. बिट कॉईनचे मूल्य वाढेल म्हणून यात गुंतवणूक केली जात आहे. जेणे करून भविष्यात अधिक परतावा मिळेल, या उद्देशाने गुंतवणूक केली जात आहे. यातून खरेदी विक्री व्यवहारही केला जातो. यासंदर्भात केंब्रीज विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात 2.9 ते 5.8 मिलियन लोकांनी व्यवहार केल्याचे निर्दशनास आले आहे.   


पैसा व डॉलरला ज्याप्रमाणे एक मूल्य आहे, त्यानुसार यामधून जगभरात वस्तूंची देवाण घेवाण व खरेदी विक्री होते. मात्र, बिट कॉईनला कोणत्याच प्रकारचे मूल्य नाही. यामध्ये बिट कॉईनचे मूल्य वाढेल या उद्देशाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. ही गुंतवणूक धोकादायक ठरणार असून कधीही कोसळण्याची शक्यता अशतेे. यामध्ये धोका अधिक आहे. 

- दत्ता कणबर्गी, गुंतवणूक सल्लागार