Thu, Nov 15, 2018 09:30होमपेज › Belgaon › बेळगाव-बंगळूर आजपासून विमानसेवा

बेळगाव-बंगळूर आजपासून विमानसेवा

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:41PMबेळगाव : प्रतिनिधी

सांबरा विमानतळावरून बुधवारी (दि.11) अलायन्स एअरच्या सेवेला प्रारंभ होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस बेळगाव ते बंगळूरपर्यंत ही विमानसेवा असणार आहे. यामुळे विमानतळ पुन्हा गजबजणार आहे. यापूर्वी विमानतळावरून स्पाईसजेट कंपनीने सेवा दिली होती.

मात्र 30 जूनपासून बंद झाली आहे. यामुळे 11 जुलैपासून अलायन्स एअर इंडिया सेवा देणार आहे. मागील काही दिवसांपासून बेळगावची विमानसेवा बंद होती. यामुळे नागरिक व उद्योजकांना समस्या भेडसावत होती. अलायन्स एअरची विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी  असेल. प्रत्येक मंगळवारी दुपारी 3.40 ला विमान बंगळूरातून उड्डाण करून सायंकाळी 5.05 ला सांबर्‍याला पोहचेल. बेळगावातून 5.35 ला उड्डाण करून बंगळूरला 6.45 ला पोहचेल. बुधवार आणि शुक्रवारी दुपारी 2.10 वा. बंगळूरहून निघेल. दुपारी 3.35 वा. बेळगावात पोहोचेल. परतीच्या प्रवासात बेळगावहून दुपारी 4.05 ला उड्डाण करून बंगळूरला 5.35 ला पोहोचणार आहे.