बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव-बागलकोट रस्ता मृत्यूचा मार्ग बनला आहे. अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. प्रशासनाकडून रस्त्यावरील अपघातासंबंधी जागृती होणे गरजेचे आहे. या मार्गावर चार ते पाच अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. बेळगावहून गांधीनगर, कुडची, शिंदोळी क्रॉस, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री, पंतबाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, करडीगुद्दी यापुढे नेसरगी भागात महिन्यातून चार ते पाच अपघात घडत असतात..
मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बेळगावहून सुमारे 150 मैलावर बागलकोट आहे. रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण झाल्याने दुचाकीस्वारांचे वेगावरही नियंत्रण राहत नाही. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे सतत अपघात होतात. बेळगाहून निघाल्यानंतर गांधीनगर, पोतदार स्कूल, पाटीलनगर, महादेवनगर, बाळेकुंद्री, मोदगा आदी ठिकाणी अपघात घडले आहेत. महाराष्ट्रात महामार्गावर तसेच जिल्ह्यांतर्गत रस्त्याच्या बाजूला जागृती फलक असतात. त्याप्रमाणे कर्नाटकातदेखील फलक लावणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.
‘वेगावर आणा नियंत्रण जीवन होईल सुखकर’ आदी संदेशफलक असतात. फलकांवर संबंधित पोलिस स्थानक व रुग्णवाहिकेचा फोन क्रमांक नमूद असतो. यामुळे महामार्गावर अपघात झाल्यानंतर तातडीने संपर्क साधता येतो. चार दिवसापूर्वी पोतदार स्कूलजवळ अपघात होऊन तरुणाला जीव गमवावा लागला. राजेश पाटील असे त्याचे नाव. त्याच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने ही घटना घडली.
फडतरवाडी व जवळील वस्त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या 5 ग्रा. पं. वर अवलंबून राहावे लागत आहे. दाखला काढण्यासाठी व अन्य कामासाठी आर्थिक भुर्दंड व वेळ खर्ची घालावा लागतो.
- अंबाजी काळे, माजी ग्रा. पं. अध्यक्ष, ऐगळी