Sat, Nov 17, 2018 16:23होमपेज › Belgaon › अप्पूगोळच्या मालमत्तांचा लिलाव करा

अप्पूगोळच्या मालमत्तांचा लिलाव करा

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 9:37PM बेळगाव : प्रतिनिधी 

काबाडकष्ट करून रुपया, रुपया जोडून मुलांच्या भविष्यासाठी आनंद अप्पूगोळच्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सहकारी सोसायटी व भीमांबिका सोसायटीमध्ये ठेवी ठेवल्या. मात्र, या सहकारी सोसायट्यांवर नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गरीब लोकांचे पैसे अडकले आहेत.  ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी  करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. 

आनंद अप्पुगोळ व त्याची पत्नी प्रेमा यांच्या संगोळ्ळी रायण्णा व भीमांबिका सोसायट्यांमध्ये रकमा ठेवल्या आहेत. आपण बांधकाम कामगार असून या कामावरच  उदरनिर्वाह चालतो. कष्टाच्या पैशाची बचत करण्याच्या उद्देशाने या सोसायट्यांमध्ये ठेव  ठेवली.  मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यामध्ये इतर कामासाठी पैसे उपयोगी पडतील, या उद्देशाने बचत केली. पण गैरव्यवहारामुळे सोसायटी बुडीत निघाली आहे. यामुळे काबाडकष्ट करून जमा केलेला पैसा वेळेत मिळणे अशक्य झाले आहे. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे.

काही जणांनी ग्राहक न्यायालयात धाव घेऊन न्याय मागितला आहे. ग्राहक न्यायालयाने वसुलीचा आदेश जारी केला आहे. आनंद अप्पुगोळने आपला विश्‍वासघात केला. ठेेव रकमेतून अप्पुगोळने कोट्यवधीची मालमत्ता केली आहे. ती विकून अप्पुगोळ  परदेशी जाण्याच्या तयारीत आहेत. ठेव परत मिळण्यासाठी त्यांच्या मालमत्तांवर टाच आणून लिलाव करण्यात यावा. यामधून मिळालेली रक्कम ठेवीदारांना देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
 

 

 

 

tags ; Belgaum, news,Appugola,Krantiveer, sangolli, rayanna, Co-operative, Society, Deposits, In case,fraud,