Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Belgaon › होतकरू विद्यार्थ्यांना आठवीत मोफत प्रवेश

होतकरू विद्यार्थ्यांना आठवीत मोफत प्रवेश

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 10:46PMबेळगाव ; प्रतिनिधी

2017-18 या शैक्षणिक वर्षी जे विद्यार्थी बेळगाव शहर व बेळगाव जिल्हा सरकारी शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असतील त्या विद्यार्थ्यांपैकी व गुणी अशा विद्यार्थ्यांकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क वा मासिक फी न आकारता त्यांना इयत्ता आठवीच्या वर्गाकरिता महात्मा फुलेंचा विचार घेऊन चालविण्यात येणारी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मराठी विद्यानिकेतन शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच हा उपक्रम शाळेचे हाती घेतला आहे.

प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या आणि खालील अटींची पूर्तता करू शकणार्‍या विद्यार्थ्यांनाच या सवलतीचा लाभ घेता येईल. सदर विद्यार्थी सरकारी शाळेत शिकत असला पाहिजे. इयत्ता सातवीच्या मार्च 2018 मधील शालेय परीक्षेत त्याला किमान ए श्रेणी असणे आवश्यक आहे. वरील अटींना पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेतली जाईल व ही परीक्षा पूर्णपणे इयत्ता सातवीच्या दुसर्‍या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित  असेल. 

या उपक्रमामध्ये अनुसुचित जाती जमातीसाठी व तालुका व जिल्हास्तरीय खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवीच्या शालेय परीक्षेचा निकला जाहीर झाल्यानंतर 18 एप्रिल 2018 पर्यंत शाळेच्या कार्यालयात परीक्षा अर्ज भरून द्यायचा आहे. अर्ज भरून दिल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी कळविले आहे. 
 

 

 

tags ; Belgaum,news,Admission,Marathi, Vidyaniketan ,School ,good, students, eighth ,free,admission,