Fri, Aug 23, 2019 22:10होमपेज › Belgaon › ५०० कोटी रुपयांची अप्पुगोळकडून फसवणूक

५०० कोटी रुपयांची अप्पुगोळकडून फसवणूक

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 10:35PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सहकारी सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ याने ठेवीदारांची 500 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठेवीदारांच्या रकमा परत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ‘भारतीय जागरूक मतदार फोरम’चे अध्यक्ष एस. बी. खानगौडर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 
निवेदनामध्ये नमूद आहे की, ठेवीवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून अप्पुगोळने दहा हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांकडून 500 कोटींच्या ठेवी स्वीकारल्या. यातून त्याने  अनेक मालमत्ता खरेदी केल्या. ठेवींची मुदतपूर्ती झाली तरी परत देण्यास नकार दर्शविला.

सोसायटीमध्ये निवृत्त जवान, निवृत्त सरकारी कर्मचारी, गृहिणी ठेव ठेवली आहे. अप्पुगोळने ठेवीदारांना ठेवी देण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्याच्यावर सहकारी खात्यानेही खटला दाखल करून चौकशी चालवली आहे. पोलिस खात्यानेही त्याच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. ठेवीदारांच्या रकमा देण्याच्या दृष्टीने सहकारी खाते व पोलिस खात्याने कोणतीच कारवाई केलेली नाही. यामुळे ठेवीदारांमध्ये असंतोेष आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणाची केंद्र सरकारमार्फत चौकशी करून अप्पुगोळची मालमत्ता जप्त करुन ठेवीदारांच्या रकमा देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी खानगौडर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन त्यांनी येथील बेळगाव जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांच्याकडेही सादर केले आहे. अप्पुगोळवर न्यायालयातर्फे कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.