Tue, Jul 23, 2019 01:55होमपेज › Belgaon › कारची काच फोडून ४० ग्रॅम सोने लंपास

कारची काच फोडून ४० ग्रॅम सोने लंपास

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 12:06AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी लावण्यात आलेल्या कारच्या काचा फोडून 40 ग्रॅमचे सोने असलेली बॅग लंपास करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मूळचे गोवा येथील पुंडलिक जिवरे यांनी याबाबत मार्केट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

मूळ गोवा येथे स्थायिक असलेले जिवरे कुटुंबीय अथणी तालुक्यातील ऐनापूरला जाऊन परत बेळगावला आले होते. मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी कार उभी करून बाजारपेठेत खरेदीसाठी गेले होते. चोरट्यांनी कारच्या काचा फोडून कारमधील बॅगची चोरी केली.  बॅगमध्ये 40 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2 हजार रु. रोख होते. शहरामध्ये कारच्या काचा फोडून चोरीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.