Wed, Jul 17, 2019 20:44होमपेज › Belgaon › पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशाचा गजर

पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशाचा गजर

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 11:05PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

थोर संत महंत आणि विचारवंतांची वेगवेगळी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल ताशाचा गजर आणि भजनाच्या मंगलमय वातावरणात 12 व्या मराठी साहित्य  संमेलनाची ग्रंथदिंडी मिरवणूक ऐतिहासिक आणि लक्षवेधी ठरली. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी यांच्यावतीने कै. साहित्यिक वि. दा. करंदीकर साहित्य नगरीत संमेलनाची सुरूवात आकर्षक दिंडीने झाली. प्रारंभी रवळनाथ मूर्ती पूजन  पुजारी नामदेव गुरव यांच्याहस्ते पार पडले. ग्रंथपूजन कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावचे सरचिटणीस अ‍ॅड. सुधीर चव्हाण व कावळेवाडी येथील मनोहर मोरे  यांच्याहस्ते झाले.

पालखी पूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर व रामचंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती पूजन सेवानिवृत्त सुभेदार मेजर दामोदर मोरे, हुतात्मा स्मारक पूजन शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले व ग्रामीण संघटक तानाजी पावशे यांच्याहस्ते झाले. ग्रंथदिंडीला रवळनाथ मंदिरापासून सुरूवात झाली. कलमेश्‍वर गल्ली छ.शिवाजी महाराज चौकातून संमेलन स्थळी पोहोचली. दिंडीत अग्रभागी भगवा ध्वज त्या पाठोपाठ छ. शिवरायांच्या वेशातील युवक, सरस्वती देवी, वासुदेव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील बालचमू, तरूण-तरूणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

लक्षवेधी ढोलताशा  निलजी येथील राजमुद्रा ढोलताश पथकाने आजच्या या ग्रंथदिंडीत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीत स्वागताध्यक्ष ज्योतिकुमार फगरे, उदघाटक आ.संजय पाटील, ग्रा. पं. अध्यक्षा शिवाजी बोकडे, ग्रा. पं. सदस्य युवक मंडळे, महिला मंडळे, संत ज्ञानेश्‍वरी पारायण सांप्रदायिक भजनी मंडळ, आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा, बालवीर विद्यानिकेतन, सेंट पॉल इंग्रजी शाळा, डॉ.गणपतराव तेंडूलकर, विद्यालय, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.