होमपेज › Belgaon › हिंडलगा कारागृहातून 12 कैद्यांची सुटका

हिंडलगा कारागृहातून 12 कैद्यांची सुटका

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 11:49PM

बुकमार्क करा

बेळगाव  : प्रतिनिधी

चांगल्या वर्तणुकीतून सुटका झालेल्या कैद्यांनी समाजात निरोगी मनाने मिसळावे, असे आवाहन उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक रामचंद्र राव यांनी केले. हिंडलगा कारागृहात बुधवारी 9 पुरुष व तीन महिला कैद्यांची चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर सुटका झाली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला जिल्हा पोलिसप्रमुख रविकांतेगौडा, उपायुक्त सीमा लाटकर, कारागृह संंवर्धन समितीचे सदस्य दीपक वाघेला, कारागृह सल्लागार समिती सदस्य व नगरसेविका अनुश्री देशपांडे, रेखा जोशी, मल्लेश चौगुले, माजी महापौर विजय मोरे, उद्योजक अभिमन्यू दागा उपस्थित होते. सुटका झालेल्या 12 कैद्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. रामचंद्र राव म्हणाले, मोठ्या जबाबदारीने आणि विश्‍वासाने कैद्यांची सुटका झाली आहे. सुटका झालेल्या कैद्यांनी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घ्यावी, समाजाचा आपणाविषयी असलेला दृष्टीकोन बदलण्याची जिद्दी राखावी. 

सुटका झालेल्या कैद्यांना त्यांच्या भागातील पोलिस ठाण्याचे बीट सदस्य बनविण्यात येणार आहे. या कैद्यांवरील जबाबदारी वाढली आहे, असे रविकांतेगौडा म्हणाले. पोलिस खात्याचे अधिकारी उपस्थित होते. कारागृह अधीक्षक टी. पी. शेषा यांनी स्वागत केले. साहाय्यक अधीक्षक मुलमनी यांनी आभार मानले.