Thu, Sep 20, 2018 14:24होमपेज › Belgaon › बेळगावला मिळणार आणखी एक मंत्रिपद

बेळगावला मिळणार आणखी एक मंत्रिपद

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMबंगळूर : प्रतिनिधी  

आषाढ महिना संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहितेचा अडसर नसल्याने याबाबत बुधवारी चर्चा करण्यात आली असून उत्तर कर्नाटकातील नेत्यांना संधी देण्यात येणार आहे. यामुळे बेळगावातील इच्छुकांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या मंत्रिमंडळात रिक्त असणार्‍या पदांवर 5 काँग्रेस आणि 1 निजद अशी सहा पदे भरण्यात येणार आहेत. दोन्ही पक्षांतील वरिष्ठांचे यावर एकमत झाले आहे. 

अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात उत्तर कर्नाटकावर अन्याय झाल्याचा आरोप करून स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात आली. मठाधीश आणि विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे काँग्रेसची कोंडी झाली होती. याविषयी आता गांभीर्याने विचार केला जात असून बेळगावसह उत्तर कर्नाटकातील आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी तसा होकार दिला आहे.