Tue, Jul 16, 2019 21:52होमपेज › Belgaon › अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी १० वर्षांचा कारावास 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी १० वर्षांचा कारावास 

Published On: Sep 02 2018 1:10AM | Last Updated: Sep 01 2018 10:50PMबेळगाव : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून प्रकरण झाकण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीला 10 वर्षांचा कारावास आणि 26 हजार रु. चा दंड असा निकाल तिसर्‍या अतिरिक्त जिल्हा आणि सत्रन्यायालयाचे न्यायाधीश जी. नंजुडय्या यांनी निकाल दिला. 

गोकाक तालुक्यात बापानेच 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. सदर प्रकरण झाकण्यासाठी मुलीला कीटकनाशक पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय तक्रार केल्यास मुलीच्या आईला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.  तसेच मुलीच्या आईच्या डोक्यात लोखंडी सळीने वार करून जखमी केले होते.  घटप्रभा पोेलिस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल झाली होती. यावरून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.  शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपी रामाप्पा याला न्यायालयाने साक्षी पुराव्याच्या आधारावर दोषी ठरवून 10 वर्षाचा कारावास व 26 हजाराचा दंड ठोठावला आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. एल. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.