होमपेज › Belgaon › बेळगावला मिनी तारांगण, ऊस अभ्यास केंद्र

बेळगावला मिनी तारांगण, ऊस अभ्यास केंद्र

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:03AMबंगळूर : प्रतिनिधी

अर्थसंकल्पामध्ये बेळगावसाठी भरीव घोषणा करण्यात आलेल्या नसल्या तरी बेळगाव शहरात थ्री-डी मिनी तारांगण, ऊस अभ्यास केंद्र, नंदगडमध्ये संगोळ्ळी रायण्णा स्मारक विकास, गोकाक-रामदुर्ग पाणीपुरवठा अशा काही योजनांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

बेळगावातील थ्री-डी तारांगणासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ते कुठे उभारायचे हे लवकरच निश्‍चित होईल. महापालिका किंवा बुडाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल. तारांगणचा लाभ विज्ञानाच्या जागृतीसाठी होईल.    

राणी चन्नम्मा विद्यापीठात एस. निजलिंगप्पा साखर तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाईल. मात्र यासाठी किती निधी, हे जाहीर करण्यात आले नाही.बेळगावात सध्या एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट या नावाने लक्ष्मीटेकला संशोधन केंद्र आहे. आता साखर तंत्रज्ञानाची बी.एस्सी. हा पदवी अभ्यासक्रम सुरू होईल.

नंदगड येथील संगोळी रायण्णा स्मारक विकास निधी म्हणून 267 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  त्यातून रायण्णा निवासी शाळेची सुधारणा, वसतीगृह उभारणी होईल. 
रामदुर्ग तालुक्यातील 46 तलावांमध्ये घटप्रभा नदीतून सालापूर लिफ्ट इरिगेशन योजनेतून पाणी नेले जाईल. यासाठी 540 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

सत्तेगिरी लिफ्ट इरिगेशनसाठी 210 कोटी, अथणी तालुक्यातील कृष्णा उजवा कालव्याच्या विकासासासाठी 137 कोटी आणि गोकाक तालुक्यातील बुत्ती बसवण्णा लिफ्ट इरिगेशनसाठी 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हे पाणी मार्कंडेय धरणाच्या (शिरुर धरण) कालव्यातून उचलले जाईल. 

दृष्टिक्षेप

  •  तारांगणासाठी 3 कोटी, जागेची निश्‍चिती लवकरच
  •  साखर तंत्रज्ञानाची बी.एस्सी. पदवी सुरू करणार
  •  540 कोटींमधून रामदुर्गातील 46 तलावांचे पुनरुज्जीवन
  •  रामदुर्गला घटप्रभा नदीतू लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणी 
  •  गोकाक तालुक्यातील पाणी योजनेसाठी 250 कोट, अथणी तालुक्यातील पाणी योजनेसाठी 210 कोटी