होमपेज › Belgaon › बेळगाव उपमहापौरपदी मधुश्री पुजारी; एक योगायोग असाही

बेळगाव उपमहापौरपदी मधुश्री पुजारी; एक योगायोग असाही

Published On: Mar 01 2018 5:55PM | Last Updated: Mar 01 2018 5:55PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावच्या बेळगाव महापौरपदी बसप्पा चिकलदीनी तर उपमहापौरपदी मधुश्री पुजारी यांची निवड झाली. मधुश्री वडगाव रहिवाशी आणि प्रभाग क्रमांक १३च्या नगरसेविका आहेत. मधुश्री यांचे पती अप्पासाहेब यांनी १९९८-९९ मध्ये महापौरपद भुषवले होते. पुजारी दाम्पत्याने बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरपद भुषवण्याचा योगायोग घडला.

उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटातून मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे आणि मेधा हळदणकर यांच्यात रस्सीखेच होती. आज झालेल्या निवडणुकीत नगरसेविका मधुश्री पुजारी यांची उपमहापौर पदी निवड झाली