Sat, Nov 17, 2018 10:03होमपेज › Belgaon › कृषी उत्पादनामध्ये बेळगाव जिल्हा अग्रेसर

कृषी उत्पादनामध्ये बेळगाव जिल्हा अग्रेसर

Published On: Dec 17 2017 1:30AM | Last Updated: Dec 16 2017 11:36PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा कृषी उत्पादनाप्रमाणेच फळे, फुले व भाजीपाला उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. विविध उत्पादनामध्ये जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी यश मिळविले आहे, असे गौरवोद‍्गार जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी काढले. 

येथील बागायत खाते व बेळगाव जिल्हा बागायत सहकारी सोसायटीच्यावतीने क्‍लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आयोजित केलेल्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. 
प्रारंभी महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हजारो फुलांचा वापर करून जागतिक शांततेचे प्रतिक बनविण्यात आले आहे. त्याबरोबरच अनेक धान्यांचा वापर करून हंपी येथील एका मंदिरासमोरील रथाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. बैलगाडीसह शेतकरी जात असल्याची प्रतिकृतीही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. बैलगाडी फुलांनी सजविण्यात आलेली आहे.  या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारची शोभेची रोपे, आकर्षक फुलांची रोपे, अनेक प्रकारची फळे त्याबरोबरच विविध प्रकारचा भाजीपाला  मांडण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 10 तालुक्यातील प्रगतीपर शेतकर्‍यांनी भाग घेतला आहे. महापौर संज्योत बांदेकर, जि.पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, जि. पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला व जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. रविकांतेगौडा यांनी प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या शेतकर्‍यांचा यावेळी गौरव केला. 

हे प्रदर्शन शनिवारपासून  सतत तीन दिवस नागरिकांना पाहण्यास खुले ठेवण्यात आले आहे.  शेवटच्या दिवसापर्यंत या प्रदर्शनाला तीन लाख पेक्षा जास्त नागरिक व शेतकरी भेट देतील, असा विश्‍वास बागायत खात्याचे वरिष्ठ अधिकारी आय. के. दोडमनी यांनी व्यक्‍त केला.

या प्रदर्शनावेळी लिंगराज पाटील, प्रकाश पाटील, शिवतेली, पी. एस. मोरे, रामचंद्र कवकण्णावर, इरय्या मठपती व इतर बागायत सोसायटीचे सभासद, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.