Wed, May 22, 2019 07:25होमपेज › Belgaon › बेळगाव-बंगळूर विमानसेवा सुरू

बेळगाव-बंगळूर विमानसेवा सुरू

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 11:29PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव-बंगळूर विमानसेवा अखेर शुक्रवारी सुरू झाली. पहिल्या दिवशी एअरबस 319 या विमानातून बंगळूरहून 83 प्रवाशी आले, तर बेळगावहून बंगळूरला 122 प्रवाशी रवाना झाले. विमानाची आसनक्षमता 122 असून विमानचे पहिले उड्डाण फुल्ल होते.

विमानसेवेचे उद्घाटन खा. प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सांबरा विमानतळावरून आठवड्यातून सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी चार दिवस ही सेवा असणार आहे. 

विमान  बंगळूरहून सकाळी 7.25 ला सुटणार असून 8.30 ते बेळगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बेळगावहून सकाळी 9.30 वाजता निघून 10.30 वाजता बंगळूरला पोहचेल.शुक्रवारी सकाळी आठ वाजता हे विमान  83 प्रवाशी घेऊन बेळगावला आले. तर 122 प्रवाशी घेऊन बंगळूरला रवाना झाले. जाणार्‍या प्रवाशांना खा. प्रकाश हुक्केरी यांच्याहस्ते पास देऊन निरोप देण्यात आला. तर येणार्‍या प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एअर इंडियाचे कर्मचारी, अ‍ॅपटेक एव्हीएशन अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी आणि शेख सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.

इतर शहरांना सेवा

बेळगावहून आता दिल्ली, वाराणसी, अहमदाबाद, जयपूर, हैद्राबाद, चेन्‍नई आणि कोलकाता या शहरांना विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि क्रेडाई संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली. त्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी  ग्वाही खा. हुक्केरी यांनी दिली.