Mon, Sep 24, 2018 16:53होमपेज › Belgaon › बेळगाव-बंगळूर, मुंबईला  25 जूनपासून विमानसेवा

बेळगाव-बंगळूर, मुंबईला  25 जूनपासून विमानसेवा

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:39AMबेळगाव : प्रतिनिधी

येत्या 25 जूनपासून एअर इंडियाची मुंबई ते बेळगाव व बेळगाव ते बंगळूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू होणार असून, सफल ठरल्यास 15 जुलैपासून नियमित विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विकास आढावा बैठकीत खासदारांनी ही माहिती दिली.  जेट एअरवेजची विमानसेवा सांबरा विमानतळावरून सुरू होती. मात्र, ती हुबळीला स्थलांतरित झाली. फायद्यात असूनही ही सेवा हुबळीला गेल्यामुळे बेळगावची विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी खासदारांकडे मागणी झाली होती.