गदारोळाने अधिवेशनाची सुरुवात

Last Updated: Oct 11 2019 1:03AM
Responsive image

Responsive image

बंगळूर : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवाय प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणल्याने प्रतिनिधींनी विधानसौध परिसरात निदर्शने केली.

अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेते सिद्धरामय्यांनी पूरग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. पण, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कार्यसूचीप्रमाणे कामकाज होणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पूरस्थितीबाबत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्यावर सुरुवातीला चर्चा नको असे स्पष्ट केले. यावरून सत्तारूढ व विरोधी   आमदारांत गदारोळ झाला. 

हिशोबकर यांना श्रद्धांजली
दरम्यान, पहिल्या दिवशी नियमाप्रमाणे नुकत्याच दिवंगत झालेल्या नेत्यांना, मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेळगावचे म. ए. समितीचे माजी आमदार अर्जुनराव हिशोबकर यांनाही अधिवेशनावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.


 

महाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी


यंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार


अन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल


कोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन


जळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर


केडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण


सोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात 


परळीत नायब तहसीलदारांना मारहाण


कोरोना मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोना वॉरियर काय करतात?