Sun, Jul 21, 2019 16:18
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › खराब हवामानामुळे बेळगाव, हुबळीचे ११३ यात्रेकरू अमरनाथजवळ अडकले

खराब हवामानामुळे बेळगाव, हुबळीचे ११३ यात्रेकरू अमरनाथजवळ अडकले

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 07 2018 12:08AMबेळगाव ः प्रतिनिधी

अमरनाथ यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंना शुक्रवारीही तळछावणीतच  (बेस कॅम्प) अडकून पडावे लागलेे. या यात्रेकरूंमध्ये बेळगावसह हुबळीतील एकूण 113 पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती हेल्पलाईनने दिली आहे. 

हुबळी, धारवाड, बेळगाव, दावणगेरी, लक्ष्मेश्‍वर, गदगसह काही भागातील एकूण 113 पर्यटक हुबळीतील एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. दोन गटांमध्ये ते होते. 56 यात्रेकरू दर्शन घेऊन सुरक्षितपणे बाहेर आले. उर्वरित 57  यात्रेकरू दर्शनासाठी गेल्यानंतर ते गुहेतच अडकले. 

त्यामध्ये वीस महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. आता ते गुहेतून बाहेर आले असले तरी तळछावणीत अडकले असून, हवामानात सुधारणा  होताच त्यांना श्रीनगरला आणले जाईल आणि तेथून ते दिल्लीला परततील, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

मानसरोवर यात्रेकरू परतीच्या मार्गाला

मानससरोवर यात्रेसाठी गेलेले पण खराब हवामानामुळे नेपाळ-चीन सीमेवर नेपाळगंज-सिमीकोट हिलसा मार्गावर अडकून पडलेल्या कर्नाटकातील 290 यात्रेकरुंसह सार्‍याच भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. कर्नाटकातील यात्रेकरू सुरक्षित असून, परतीच्या मार्गाला लागले आहेत. मानसरोवरला न जाता त्यांना मधूनच परतावे लागले आहे, अशी माहिती कर्नाटकाचे बचाव पथकातील अधिकारी आर. रेणुकुमार यांनी दै. ‘पुढारी’ला दिली. बेळगावच्या काही यात्रेकरूंसही कर्नाटकातील एकूण 290 जण नेपाळ सीमेवर अडकून पडले होते. त्यांना नेपाळमधून दिल्‍लीतील कर्नाटक भवनात नेण्यात आले. तेथून ते कर्नाटकाकडे परतत आहेत, असेही त्यांनी सांगितले.