Tue, Apr 23, 2019 02:25होमपेज › Belgaon › पारदर्शकपणे जबाबदारी पार पाडा

पारदर्शकपणे जबाबदारी पार पाडा

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:46AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुका यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी पारदर्शकपणे कर्तव्य बजावले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यतर्‍हेने पार पाडावी, असे आवाहन  निवडणूक विभागाच्या सामान्य पर्यवेक्षकांकडून करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

निवडणक आयोगाकडून जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात होणार्‍या निवडणुकांच्या पार्श्‍वभूूमीवर  11 निवडणूक पर्यवेक्षक अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या अधिकार्‍यांना देण्यात आलेले प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था तसेच निवडणुकी संदर्भात आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यांचे निवारण करणे, अशा महत्त्वाच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. 

निवडणुकीदरम्यान होणार्‍या गैरकारभारांवर आळा घालण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या एसएसटी सुरक्षारक्षकांबरोबर अतिरक्‍त अधिकर्‍यांची नेमणूक करुन गस्त वाढविण्यात यावी, अशी सूचना अधिकार्‍यांना करण्यात आली. आंतरराज्य सीमा सुरक्षा ठेवण्यासाठी व  गैरकारभार रोखण्यासाठी आंतरराज्य अधिकार्‍यांची बैठक घेऊन गैरकारभारांवर आळा घालावा, अशी सूचनाही अधिकार्‍यांना करण्यात आली. 

निवडणूक काळात मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था व पोलिस अधिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख सुधिरकुमार रेड्डी यांनी दिली. तसेच पोलिस आयुक्‍तांच्या व्याप्‍तीत येणार्‍या मतदार संघात नियोजित करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था, पोलिस अधिकार्‍यांचे नियोजन, संवेदनशील भागतील माहिती पोलिस आयुक्‍त राजप्पा, उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी दिली. स्वीप समितीचे अध्यक्ष आर. रामचंद्रन यांनी निवणुकीसाठी करण्यात आलेली तयारी व इतर आवश्यक माहिती दिली. 

यावेळी जिल्हाधिकारी एस. झियाउल्‍ला, निवासी जिल्हाधिकारी बी. एच. बुध्याप्पा, निवडणूक पर्यवेक्षक मूर्ती, डॉ. मनीषकुमार, भूवनेश यादव, पी. व्येंकटस्वमी रेड्डी, अक्षित तिवारी, गोविंद जस्वाल आदी  अधिकारी उपस्थित होते.