Sun, Feb 17, 2019 11:04होमपेज › Belgaon › मराठी भाग म्हैसूरला जोडल्यापासून सीमालढा 

मराठी भाग म्हैसूरला जोडल्यापासून सीमालढा 

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 11:22PMबेळगाव : प्रतिनिधी

1956 साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेनुसार भौगोलिक सलगता, खेडे हा घटक, लोकेच्छा, या गोष्टी विचारात न घेता घेता मराठी भाषक भाग म्हैसूर राज्याला जोडण्यत आला.  तेव्हापासून सीमालढ्याची चळवळ सुरु आहे, अशी माहिती प्राचार्य आनंद मेणसे यांनी दिली. त्यांनी अन्य विषयांवरही विचार मांडले.  

क्रांतीदिनानिमित्त 9  रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये ‘चला समजून घेऊ सीमालढा’ या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील समाज विभागाने केले होते. यासाठी प्रमुख पाहुणे प्राचार्य मेणसे उपस्थित होते. त्यांनी मुलांना ओघवत्या शैलीमध्ये सीमालढा समजावून दिला.  बेळगाव शहराला लाभलेली ऐतिहासिक परंपरा, येथील चळवळी व त्यामध्ये असलेला स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग, स्वातंत्र्यासाठी 1942 साली झालेल्या छोडो भारत चळवळीत कर्नाटकातील लोकांचा सहभाग व सीमाचळवळ हा सुद्धा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून दिला. असा सखोल इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला व अपुर्‍या माहितीमुळे झालेली विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था दूर केली. 

याप्रसंगी मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, गजानन सावंत, समाज विभागप्रमुख माया पाटील, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आर्या गायकवाड हिने केले. आभार भुजंग पाटील यांनी मानले.