Fri, Apr 26, 2019 00:04होमपेज › Belgaon › ब. कुडची स्मशानासाठी महापालिकेचा पुढाकार

ब. कुडची स्मशानासाठी महापालिकेचा पुढाकार

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 8:17PMबेळगाव : प्रतिनिधी

बसवण कुडची स्मशानभूमीचा आराखडा बनवण्याचे काम मार्गी लागले आहे. उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी बुधवारी स्मशानाची पाहणी केल्यानंतर तातडीने आराखडा बनवून कामे सुरू करण्याची सूचना त्यांनी दिली.

बसवण कुडचीची स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात अडकली होती. गावातील  युवकांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमी विकासासाठी मदत निधी जमवून काम सुरू केले आहे. स्मशानभूमीत पाण्याची समस्या असून, गवत वाढले आहे. शेड नसल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी आहेत. हे लक्षात घेऊन युवकांनी आतापर्यंत दीड लाखाचा मदत निधी जमवून बसवन कुडचीतील विकासकामांना सुरुवात केली. यासाठी अजून मदत निधीची गरज असून गावातील प्रत्येक घरातून 100 ते 200 रु. प्रमाणे वर्गणी जमा करावयास सुरु केली आहे. कांही जणांनी 500 ते 2000 रु. पर्यंतची मदत केली आहे. 

पुढारीने हे वृत्त सर्वप्रथम 22 जूनच्या अंकात बातमी प्रसिध्द करताच तिची दखल घेऊन दुसर्‍या दिवशी महापालिकेतर्फे  स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली. तर बुधवारी 27 रोजी पुन्हा स्मशानभूमी विकासाचा नियोजित आराखडा बनविण्यासाठी उपमहापौर मधुश्री पुजारींसह महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यानी बसवन कुडची स्मशानभूमीला भेट दिली. 

स्मशानभूमीचे सपाटीकरण करुन फेव्हर्स बसविणे, सरंक्षण भिंत बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे, हायमास्ट बसविणे, अंत्यसंस्कार करण्यासाठी चार चौथर्‍याची उभारणी करणे, 20 बाय 60 फुट लांबीचे शेड उभारणे आदि कामासबंधीचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला लवकरच मंजूरी मिळवून कामाला चालना मिळणार असल्याची माहिती उपमहापौर पुजारी यांनी दिली. तातडीने स्मशानभूमीत हायमास्ट बसविण्याची सूचना आर.एच. कुलकर्णी यांना उपमहापौरांनी घटनास्थळी केली.

याप्रसंगी महापालिकेचे उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी उपमहापौर नागेश मंडोळकर, नगरसविका सुधा भातकांडे, विनायक गुंजटकर, अशोक पुजारी, महापालिका अभियंता व्ही.एस हिरेमठ, सहायक कार्यकारी अधिकारी आर. एच कुलकर्णी, पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी एस. आर. एळेबळ्ळी. पर्यावरण अभियंता उदयकुमार तळवार, एम. वाय. नरसन्नवर, अ‍ॅड. यल्लाप्पा दिवटे, बाबू बेडका, बसवंत बेडका, तानाजी भातकांडे, सुनिल निलजकर, संतोष बेडका, यल्लाप्पा मुचंडीकर, जोतिबा लोहार, परशराम चौगुले, विजय सावकारसह गावातील नागरिक उपस्थित होते.