Wed, Jun 26, 2019 17:33होमपेज › Belgaon › बनावट नोटांचे बांगलादेशी कनेक्शन

बनावट नोटांचे बांगलादेशी कनेक्शन

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 11:49PMचिकोडी : काशिनाथ सुळकुडे

जिल्ह्यातील बनावट नोटांचे थेट बांगलादेशशी कनेक्शन असल्याचे उघड झाले असून, त्यादृष्टीने चिकोडी, रायबागसह विजापूर आणि बागलकोटमध्येही राष्ट्रीय तपासणी पथक अर्थात एनआयएने तपासणी चालवली आहे. बनावट नोटांप्रकरणी सोमवारी रात्री चिकोडीतून एका युवकाला अटक केल्यानंतर आज, मंगळवारी रायबाग तालुक्यातून आणखी एका युवकाला अटक करण्यात आली. मुंबईच्या एनआयए पथकाने ही कारवाई केली असून, सोमवारपासून हे पथक बेळगाव जिल्ह्यात ठाण मांडून आहे.

भारताची आर्थिक स्थिती खिळखिळी करण्यासाठी परदेशातून भारतीय चलनाच्या बनावट नोटांची तस्करी करण्यात येत असून देशातील सर्व राज्यांत कार्यरत असल्याचा संशय एनआयएच्या सूत्रांनी व्यक्‍त केला आहे.

चिकोडीतून सोमवारी रात्री अशोक कुंभार या युवकाला 80 हजारांच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली. त्यानंतर एनआयएच्या पथकाने मंगळवारी रायबाग तालुक्यातील  गुंडवाड येथून राजेंद्र बाबू पाटील याला ताब्यात घेतले.  त्याच्याकडे बनावट नोटा सापडल्या नसल्या, तरी कारवाई होण्याच्या भीतीने त्याने बनावट नोटा जाळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला.चिकोडीत एनआयएच्या पथकाने छापा टाकल्यानंतर बनावट नोटांची तस्करी, छपाईत सामील लोकांचे धाबे दणाणले असून ते भूमिगत झाल्याचे समजते.