Tue, May 21, 2019 04:16होमपेज › Belgaon › मुद्रांक, नोंदणी शुल्क उत्पन्नात घट

मुद्रांक, नोंदणी शुल्क उत्पन्नात घट

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 07 2017 12:13AM

बुकमार्क करा

बंगळूर ः प्रतिनिधी

राज्याला स्टँप व नोंदणी फीद्वारे मिळणारे उत्पन्न वस्तू व सेवा करामुळे व ‘रेरा’मुळे घटले आहे. 2015-16 मध्ये राज्याला 8,248 कोटी 78 लाख रु. चा महसूल मिळाला होता. परंतु, 2016-17 मध्ये त्यामध्ये घट होऊन तो 7,830 कोटी 77 लाख रु. इतका मिळालेला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आठ महिन्यांच्या कालावधीपर्यंत 5,291 कोटी 44 लाख रु. इतकाच महसूल मिळालेला आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदी आदेशानंतर व वस्तू व सेवा कर लागू केल्यानंतर राज्यातील बाजारपेठेतील उलाढाली थंडावल्या आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत राज्याला स्टँप व नोंदणी फीद्वारे 7000 कोटी रु. पर्यंतच महसूल मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2016-17 मध्ये जी महसुलात घट झाली ती प्रामुख्याने नोटाबंदी निर्णयामुळे झाल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. चालू आर्थिक वर्षामध्येही नोटाबंदीबरोबरच 12 टक्के लावण्यात आलेल्या वस्तू व सेवा कराचाही गंभीर परिणाम महसुलावर झालेला आहे. यापूर्वी हा कर 7.5 टक्के इतका होता. बांधकाम पूर्ण केलेल्या इमारतींची खरेदी थंडाल्यावमुळे नोंदणी फीच्या महसुलावर गंभीर परिणाम झालेला आहे.