Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Belgaon › अतिक्रमित घरे मार्च अखेरपर्यंत वैध : महसूलमंत्री तिम्मप्पा

अतिक्रमित घरे मार्च अखेरपर्यंत वैध : महसूलमंत्री तिम्मप्पा

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 07 2017 12:07AM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी   

 ग्रामीण भागात सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून बांधलेली घरे येत्या मार्च अखेरपर्यंत वैध (सक्रम) करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री कागोडु तिम्मप्पा यांनी दिली. येथे बुधवारी पत्रकारांशी ते बोलत होते.

सुमारे 25 लाख जणांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे समजून येते. या रहिवाशांना मार्च अखेरपर्यंत हकौकपत्रांचे वितरण करण्यात येईल. अवैध (अक्रम) घरे वैध (सक्रम) करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून येत्या फेबुु्रवारी महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करता येतील, असे ते म्हणाले. अक्रम? सक्रम योजनेंतर्गत अवैध घरे वैध करण्याची मुभा 2012 पर्यंत घरे बांधलेल्यांनाच देण्यात आली होती. आता यामध्येही बदल करण्यात आला असून 2015 पर्यंत घरे बांधलेल्यांनाही घरे वैध करून घेता येतील. घरे वैध करून घेण्यासाठी आतापर्यंत सुमारे 7 लाख अर्ज दाखल झाले आहेत.