होमपेज › Belgaon › उच्च शिक्षणात कर्नाटक पिछाडीवर 

उच्च शिक्षणात कर्नाटक पिछाडीवर 

Published On: Feb 05 2018 2:01AM | Last Updated: Feb 04 2018 11:43PMबंगळूर : प्रतिनिधी       

राज्यात उच्च शिक्षणासाठी दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही दक्षिण राज्यातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवाल 2016? 17  चा परामर्ष घेतल्यास राज्य सरकारने उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढविण्यासाठी आवश्यक उपक्रम हाती घेण्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे आता राज्यातील 18 ते 23 वर्षे वयोगटातील लोकसंख्येपैकी 26 टक्के पदवीधर उच्च शिक्षण घेण्यात स्वारस्य दाखवित आहेत. संपूर्ण देशाच्या तुलनेत कर्नाटकात उच्च शिक्षण घेण्यार्‍यांचे प्रमाण एक टक्क्याने वाढले आहे.

 तर दुसरीकडे शेजारील महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ राज्याशी तुलना केल्यास कर्नाटकातील उच्च शिक्षण क्षेत्रातील कार्य निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात परिशिष्ट जाती?जमातीच्या उमेदवारांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दरम्यान, राज्याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव विजय भास्कर यांनी हा अहवाल पुढे ठेवून प्राथमिक शिक्षण, पदवीपूर्व शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण खात्यातील अधिकार्‍यांची दोन सत्रात बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. 

पदवीपूर्व शिक्षणाच्या टप्प्यात निकालाचे प्रमाण वाढविण्यासाठी तीन प्रमुख टप्पे यावर्षांपासून हाती घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील इंग्लिश व्याकरण शिक्षणासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच परिशिष्ट जाती? जमातीच्या विद्यार्थ्यांना दसरा सुट्टीमध्ये विशेष वर्ग घेण्यात आले आहेत. त्याशिवाय प्राध्यापकांसाठीही  विशेष कार्यशाळा घेण्यात आली असल्याची माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका सी. शिखा यांनी  दिली.