Sun, May 19, 2019 12:16
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › चार वर्षांत कर्नाटकाला १९ अन्‍न आयुक्‍त

चार वर्षांत कर्नाटकाला १९ अन्‍न आयुक्‍त

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:32PM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी

राज्यामध्ये काँग्रेसचे सिद्धरामय्या सरकार सत्तेवर आल्यापासून ते आतापर्यंत गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत अन्‍न व नागरी पुरवठा खात्याच्या आयुक्‍तांची 19 वेळा  बदली करून एक नवा उच्चांक निर्माण केला आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा आयुक्‍तांना इतक्या वेळा बदलण्याचा प्रकार राज्य सरकारने का केला, हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. हे बदली करण्याचे धोरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशविरूद्ध आहे. एखाद्या अधिकार्‍याचा एका ठिकाणी अवधी पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली अन्यत्र करणे हे चुकीचे आहे. एका ठिकाणी पूर्णवेळा सेवा बजावल्याशिवाय तो अधिकारी प्रभावी व तत्पर सेवा जनतेला देण्याचे कामकाज कसे करणार? असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. 

जून 2013 ते आतापर्यंत राज्य सरकारने आयएएस व केएएस अधिकार्‍यांची आयुक्‍तपदावर नियुक्‍ती करून त्यांचा कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच त्या पदावरून त्यांची अन्यत्र बदली केली आहे. आतापर्यंत सरकारने एक वर्ष व तीन दिवसानंतर आयुक्‍तांच्या बदल्या केल्या आहेत.  आतापयर्ंत सरकारने 14 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. तर चार अधिकार्‍यांकडे प्रभारी अधिकार देण्यात आला होता. म्हणजे प्रत्येक अधिकार्‍याने आयुक्‍त म्हणून तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी त्या पदावर कार्य केले आहे. मनोजकुमार या अधिकार्‍यांची तर नियुक्‍ती केल्यानंतर केवळ तीन दिवसांमध्येच बदली केली आहे. तर नवीन राजसिंह यांनी त्या पदावर केवळ एक महिना सेवा बजाविली आहे. आर. आर. जन्नू व अजय नागभूषण यांनी एका महिन्यापेक्षा जास्त सेवा बजाविली आहे. 

अनुराग तिवारी या आयुक्‍तांचा 17 मे 2017 रोजी लखनौ  येथे गेलेले असताना त्यांचा खून करण्यात आला. त्यांच्या भावाने अनुरागचा खून अन्न व नागरी पुरवठा खात्यामधील फार मोठा घोटाळ जाहीर करतील या उद्देशानेच त्यांचा खून करण्यात आल्याची तक्रार केली आहे. आयुक्‍तांच्या बदल्याप्रमाणेच या खात्याचे मंत्री देखील बदललेले आहेत. प्रथम अन्न व नागरीपुरवठा मंत्रीपदी दिनेश गुंडूराव हे होते. तर सध्या त्या मंत्रिपदावर यु. टी. खादर हे कार्यरत आहेत.