Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Belgaon › कलबुर्गी, गौरी यांची हत्त्या एकच पिस्तुलाने

कलबुर्गी, गौरी यांची हत्त्या एकच पिस्तुलाने

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 1:38AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तूल वापरण्यात आल्याचे न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या दृष्टीने आता एसआयटीने तपास सुरू केला आहे.

गौरी हत्येचा तपास वर्षभरातच पूर्ण करण्यात एसआयटीला यश मिळाले आहे. हा तपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना कलबुर्गी तपासातही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. कलबुर्गी हत्येचा तपास सीआयडी करत आहे. एसआयटीने सीआयडीकडे आवश्यक पुरावे सुपूर्द केले आहेत. 

आतापर्यंत या दोन्ही हत्यांमधील संशयित एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले होते. आता हत्यांसाठी 7.65 एम. एम. ची एकच पिस्तूल वापरण्यात आल्याने लवकरच तपास पूर्ण होण्याची शक्यता आहे.