Mon, May 20, 2019 22:57होमपेज › Belgaon › वादग्रस्त पत्रकार बेलेगेरेला अटक

वादग्रस्त पत्रकार बेलेगेरेला अटक

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 09 2017 12:36AM

बुकमार्क करा

बंगळूर ः प्रतिनिधी

पोलिसांनी वादग्रस्त पत्रकार व हाय बंगळुरचे संपादक रवी बेलेगेरे  यांनाही सहकार्‍याच्या हत्येसाठी सुपारी दिल्याच्या संशयाखाली शुक्रवारी अटक करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे ज्याला बेलेगेरे यांनी सुपारी दिली त्याच सुपारी किलरने गौरी लंकेश यांचा खून केल्याचा संशय आहे.  गौरी लंकेश यांच्या खुनाचा संबंध विजापूर येथील अटक केलेल्या शस्त्रास्त्र वितरक ताहिर हुसेन ऊर्फ अनुपगौडा याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताहिरने बसाप्पा हरीजन याचा खून करण्यासाठी शस्त्र पुरवठा केला होता. शशिधर मुंदवडगी हाही बेकायदा शस्त्र वितरक असून तो शार्पशूटर म्हणून कुप्रसिद्ध आहे. शशिधरने ताहिरकडून पिस्तूल व दोन काडतुसे घेतली होती. शशिधरला गुरुवारी विजापूरमध्ये 

अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार बेलेगेरे यांनी त्यांचा सहकारी पत्रकार सुनील हेग्गवरळ्ळी याचा खून करण्यासाठी आपल्याला कंत्राट दिले होते, अशी कबुली दिल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. बेलेगेरे यांनीच आपल्याला शस्त्र, चार काडतुसे व चाकु हेग्गवरळ्ळी याचा खून करण्यासाठी दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यासाठी त्याने आपल्याला 15 हजार रुपयांची अडव्हॉन्स रक्कमही दिली होती. परंतु अखेरच्या क्षणी त्यांचा हा प्लॅन फसला व हेग्गवरळ्ळी याच्या निवास स्थानासमोरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये शशिधर आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी बेळेगेरे यांच्या कार्यालय, निवास व कारची झडती घेऊन त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर त्याला अटक केली. 

सेंट्रल क्राईम ब्रँचचे संयुक्त आयुक्त सतीशकुमार यांनी बेलेगेरे याला अटक केल्यानंतर शुक्रवारीच त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलिस कस्टडी घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, शशिधरकडील शस्त्र जप्त केले असून ते तपासणीसाठी पाठवून दिले आहे. या सर्व घडामोडींचा गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल संबंध आहे का? त्याची कसून चौकशी एसआयटीने सुरु केली आहे. लंकेश यांच्या खुनासाठी बेलेगेरे यानेच शशिधरची नियुक्ती केली होती का, यासंबंधीही तपास सुरु आहे. बेलेगेरेला कर्नाटक विधानसभेचे सभापती के. बी. कोळीवाड यांनी आमदारांवर अवमानकारक लिखाण केल्याबद्दल  एक वर्षाची शिक्षा व दंड ठोठावला आहे. बेलेगेरेच्या घरातून पिस्तुल व बंदूक जप्त पत्रकार सुनील हेग्गरवळी याचा सुपारी देऊन खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली रवि बेलेगेरे, सुपारी किलर शशिधर मुंडेवाडी यांना अटक करून त्यांच्यावर भादंवि 307  व 120 बी कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.  बेलेगेरे यांच्या घरातून एक पिस्तुल, एक डब्बल बॅरेल, बंदूक व काही काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे.