Tue, Jun 25, 2019 21:46होमपेज › Belgaon › भाजपकडून सिद्धरामय्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

भाजपकडून सिद्धरामय्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 13 2018 12:23AM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी    

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या व काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिनेश गुंडूराव यानी भाजप, आरएसएस व बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणजे दहशतवादी असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबद्दल त्यांच्याविरुध्द भाजपने पोलिस आयुक्त सुनीलकुमार यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे. त्या तक्रारीच्या पुष्ठर्थ माजी मंत्री एस. सुरेशकुमार यानी सीडीही सादर केली आहे. मुख्यमंत्र्यानी केलेले वक्तव्य बेकायदेशीर असून एका घटकाच्या विरुध्द त्यानी कटकारस्थान केल्याचे स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याला दिनेश गुंडुराव यानी पाठिंबा देऊन त्यांचा  उल्लेख जिहादी असा केला आहे.

त्याबद्दल पोलिस आयुक्तानी त्या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुरेशकुमार यानी केली आहे. ...तर अटक करा   माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यानी आपण आरएसएसचे कट्टर सक्रीय कार्यकर्ते आहोत. सिध्दरामय्या याना  हिम्मत असेल तर त्यानी आपल्याला  अटक करावी, असे आव्हान शेट्टर यानी दिले आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंती कार्यक्रमामध्ये  ते पत्रकारांशी बोलत होते. संघटनेवर बंदी नाही : गृहमंत्री   राज्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसह कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्याचा कर्नाटक सरकारचा विचार नसल्याचे गृहमंत्री रामलिंगारेड्डी यानी जाहीर केले आहे. भाजपने पीएफआय व एसडीपीआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यावर गृहमंत्र्यांनी आपली ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.